वर्षभरात घटवणार दीडशे किलो वजन
By Admin | Updated: March 30, 2015 01:57 IST2015-03-29T23:37:25+5:302015-03-30T01:57:25+5:30
भरभक्कम आहार आणि जबरदस्त ३०१ किलो वजन असणाऱ्या इराकी व्यक्तीने नवी दिल्लीतील बीएलके सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात स्वत:वर वजन उतरवणारी

वर्षभरात घटवणार दीडशे किलो वजन
नवी दिल्ली : भरभक्कम आहार आणि जबरदस्त ३०१ किलो वजन असणाऱ्या इराकी व्यक्तीने नवी दिल्लीतील बीएलके सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात स्वत:वर वजन उतरवणारी शस्त्रक्रिया करून घेतली असून, अशा शस्त्रक्रियेतून त्याचे १५१ किलो वजन वर्षभरात उतरवले जाणार आहे. अली सद्दाम असे या इराकी नागरिकाचे नाव आहे.
अनेक रुग्णालयांची मदत
अली आपल्या वजनासंबंधी बोलताना म्हणाला, वाढत्या वजनामुळे मला एकाकी राहण्याची वेळ आली होती. माझी भूक दररोज वाढत होती. कितीही खाल्ले तरीही परत खावे वाटत होते. अशा पद्धतीने मी कितीतरी वर्षे जगलो. वाढत्या आहारामुळे चरबी साठते व आपले वजन वाढते हे मला कळलेच नाही. मी कधीही, कोठेही झोपत असे.
१६ मार्चला अली रुग्णालयात दाखल झाला. त्याची फुफ्फुसे व मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी त्याला द्रव आहारावर ठेवण्यात आले. त्यामुळे यकृत आकुंचित झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया सुरळीत झाली. पहिल्या टप्प्यात २० किलो वजन कमी झाले असून, आपल्याला हलके वाटते असे अलीचे म्हणणे आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)