केंद्रीय कर्मचा-यांना साप्ताहिक प्रशिक्षण
By Admin | Updated: February 12, 2015 00:20 IST2015-02-12T00:20:06+5:302015-02-12T00:20:06+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिलेला असतानाच आता आपल्या अंतर्गत

केंद्रीय कर्मचा-यांना साप्ताहिक प्रशिक्षण
नवी दिल्ली : शासकीय कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिलेला असतानाच आता आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व सचिवांना दिले आहेत.
अशा प्रकारचे प्रशिक्षण अगोदरच देण्यात आलेले असल्यास तसे पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यासाठी कृती अहवाल पाठविण्याचे निर्देशही कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सचिवांना दिले आहेत. जनताकेंद्रित शासनासाठी कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन याचे महत्त्व लक्षात घेऊन डीओपीटीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये साप्ताहिक प्रशिक्षण घेण्याचे निर्देश सर्व मंत्रालयांना दिले होते.
सर्व मंत्रालये आणि विभागांना साप्ताहिक प्रशिक्षण घेण्याची आणि पीएमओला कृती अहवाल सादर करण्याची पुन्हा एकदा विनंती करण्यात आली आहे.