शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दिल्लीतही कोरोनाचा हाहाकार, वीकेंड कर्फ्यूची केजरीवाल यांची घोषणा; जिम, मॉल्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 14:02 IST

दिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती.

ठळक मुद्देदिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्बंधांची घोषणा केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे अन्य राज्यांमध्येही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आज घोषणा केली. वीकेंज कर्फ्यू हा शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली. वीकेंड कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसंच ज्यांच्या लग्नाच्या तारखा यादरम्यान निश्चित आहेत त्यांना पास दिले जातील. याशिवाय जिम, मॉल, स्पा, बाजार आणि अन्य ठिकाणं बंद ठेवण्यात येतील. याशिवाय चित्रपटगृहं ३० टक्के प्रमाणात सुरू राहिल, असं केजरीवाल यांनी नमूद केलं. आठवड्याच्या अखेरिस केवळ ठिकाणांच्या हिशोबानं बाजार उघडले जातील. लोकांनी आठवड्यातील पाच दिवस काम करावं. परंतु वीकेंडला घरातच राहण्याचे प्रयत्न करावे. जर कोणाला रुग्णालय, विमानतळ, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन आदि ठिकाणी जायचं असेल तर यादरम्यान त्यांना सूट दिली जाईल. परंतु यासाठी त्यांना पास घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बेड्सची कमतरता नाही"दिल्लीत सध्या बेड्सची कमतरता नाही. काही रुग्णालयांमधील बेड्स भरले आहेत. परंतु काही लोकांना त्याच रुग्णालयात जायचं आहे म्हणून काही समस्या उद्भ्वत आहेत. जे कोणी आजारी असतील त्यांचा जीव वाचवावा हे आमचं प्राधान्य आहे. दिल्लीत आताही पाच हजारांपेक्षा अधिक बेड्स रिकामे आहेत आणि त्यांची संख्याही वाढवली जात आहे," असं केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे