लग्नापूर्वी नववधूने घातली अजब अट, ऐकून थक्क झाले सासरचे!
By Admin | Updated: January 6, 2017 18:23 IST2017-01-06T16:05:16+5:302017-01-06T18:23:01+5:30
लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात.

लग्नापूर्वी नववधूने घातली अजब अट, ऐकून थक्क झाले सासरचे!
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 6 - लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात. पण मध्य प्रदेशातील भिंड येथील किसीपुरा गावात अशी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या गावात राहणाऱ्या प्रियांका भदोरिया या तरुणीने आपल्या लग्नापूर्वी सासरच्या मंडळींसमोर अशी अट घातली ज्याची चर्चा सध्या होत आहे.
त्याचे झाले असे की, सासरची मंडळी जोपर्यंत दहा हजार झाडे लावत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी अजब अट सासरच्या मंडळींसमोर घालली. प्रियांकाची ही अट ऐकून सासरच्यांना ही बाब थोडी विचित्रच वाटली, पण त्यांनी होणाऱ्या सुनबाईंची ही अट मान्य केली. त्यानंतर प्रियांकाचे धुमधडाक्यात लग्न लावून देण्यात आले. यासंदर्भातील वृत्त न्यूज 24 या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे.
या भागातील प्रथेनुसार लग्नापूर्वी सासरच्यांकडून नववधूला काय हवे हे विचारले जाते. बहुतांश मुली कपडे, दागदागिन्यांची मागणी करतात. पण प्रियांकाने मात्र यापैकी काहीच न मागता दहा हजार झाडे लावण्याची मागणी केली. प्रियांकाला लहानपणापासूनच वृक्षारोपनाची आवड असल्याने तिने अशी मागणी केली. या दहा हजार झाडांपैकी पाच हजार झाडे माहेरी तर पाच हजार झाले सासरी लावण्यात यावीत, अशी तिची इच्छा आहे. देशात वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती पाहता प्रियांकाने केलेल्या या मागणीसारख्या प्रयत्नांची देशाला गरज आहे.