शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल शोधणे होणार सोपे, सरकारने लाँच केले पोर्टल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 7:34 PM

'या पोर्टलवर माहिती आल्यास मोबाईल ब्लॉक होईल.'

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत हरवलेला अथवा चोरी गेलेला मोबाईल शोधणे सोपे होणार आहे. सोमवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत एका नवीन पोर्टलचे उद्घाटन केले. 

www.ceir.gov.in असे या पोर्टलचे नाव आहे. आता मोबाईल चोरीला किंवा हरवला असेल तर त्यासंदर्भातील माहितीचा पोलीस तपशील आणि IMEI नंबरची माहिती या नव्या पोर्टलवर दिली जाणार आहे. या पोर्टलवर माहिती आल्यास मोबाईल ब्लॉक होईल. म्हणजेच सीम बदलल्यानंतरही त्या मोबाईलवरून कॉल जाणार नाहीत. मुंबईत पायलट प्रोजेक्टचा आढावा घेतल्यानंतर दिल्लीत हे पोर्टल लाँच करण्यात आले.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 5 जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी दिले. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून देशात लवकरच 5 जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सैद्धांतिक निर्णय घेतला आहे. लवकरच हा पायलट प्रोजेक्ट अंमलात आणला जाईल.'

5 जी साठी नवीन पायलट प्रोजेक्टची जिम्मेदारी संचार सचिव अंशु प्रकाश यांच्याकडे दिली आहे. आधार तर फिजिकल ओळखीचा डिजिटल पुरावा आहे. यावरून कारण नसताना वादविवाद होत आहेत. डिजिटल प्रशासनामार्फत आम्ही देशाचे 978 मिलियन डॉलर वाचविले आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. याचबरोबर, मोबाईल फोनची सेफ्टी सिक्युरिटी सर्वाधिक गरजेची आहे, असेही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान