पीर्ण शांतादुर्गा विद्यालयात वनम

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

होत्सव थिवी : पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आज झपाट्याने र्‍हास होत असलेल्या वनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे उद्गार श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णचे प्राचार्य उमेश नाईक यांनी काढले. श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित केलेल्या वनमहोत्सव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधीत करताना झाडे लावणे ही सरकारची जबाबदारी असे न मानता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एक व्रत म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यालयाच्या परिसरात अभिनव पद्धतीने वनमहोत्सव साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करण्याआधी सोनिया देसाई, संपदा सावंत, प्राजक्ता परब, गौरी च्यारी, दिप्ती रेवोडकर, अमोल गावस या मुलांनी तुळस, जांभुळ, अडुळसा, बेल इत्यादी वनस्पतीचे वनौषधी म्हणून काय उपयोग आहेत हे विस्ताराने सांगितले. संपूर्ण कार्यक

Weanam in Peen Shantadurga Vidyalaya | पीर्ण शांतादुर्गा विद्यालयात वनम

पीर्ण शांतादुर्गा विद्यालयात वनम

त्सव थिवी : पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आज झपाट्याने र्‍हास होत असलेल्या वनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे उद्गार श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णचे प्राचार्य उमेश नाईक यांनी काढले. श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित केलेल्या वनमहोत्सव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधीत करताना झाडे लावणे ही सरकारची जबाबदारी असे न मानता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एक व्रत म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यालयाच्या परिसरात अभिनव पद्धतीने वनमहोत्सव साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करण्याआधी सोनिया देसाई, संपदा सावंत, प्राजक्ता परब, गौरी च्यारी, दिप्ती रेवोडकर, अमोल गावस या मुलांनी तुळस, जांभुळ, अडुळसा, बेल इत्यादी वनस्पतीचे वनौषधी म्हणून काय उपयोग आहेत हे विस्ताराने सांगितले. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनाधिकारी प्रा. रामचंद्र नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी विश्वास नाईक, यशवंत साखळकर यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) फोटो : वनमहोत्सवात वृक्षारोपण करताना प्राचार्य उमेश नाईक. सोबत प्रा. रामचंद्र नाईक देसाई, प्रा. रजनीकांत सावंत, ग्रंथपाल आत्मा ठाकूर. (भारत बेतकेकर) ०९०७-एमएपी-१०

Web Title: Weanam in Peen Shantadurga Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.