शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

७१ खासदारांच्या संपत्तीत २८६ टक्क्यांनी झाली वाढ;  एडीआरचा अहवाल, अशी वाढली संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:38 IST

या काळात भाजपचे कर्नाटकातील खासदार रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ नोंदविली गेली, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शुक्रवारी येथे जारी करण्यात आला.

नवी दिल्ली : २००९ ते २०१९ या कालावधीत लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या ७१ खासदारांच्या संपत्तीत सरासरी तब्बल २८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात भाजपचे कर्नाटकातील खासदार रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ नोंदविली गेली, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शुक्रवारी येथे जारी करण्यात आला.जिगजिनगी यांच्याकडे २००९ मध्ये एकूण १.१८ कोटी रुपयांची मालमत्ता होती. ती २०१४ मध्ये ८.९४ कोटी रुपये आणि पुढे २०१९ मध्ये ५०.४१ कोटी रुपयांवर गेली, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान जिगजिनगी यांनी सादर केलेल्या शपथपत्रांच्या आधारे एडीआरने त्यांच्या संपत्तीतील वाढीचा लेखाजोखा मांडला आहे. ते कर्नाटकातील विजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

दुसऱ्या क्रमांकावरही कर्नाटकचेच खासदार -एडीआर-नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार, कर्नाटकातील भाजपचे आणखी एक खासदार पी. सी. मोहन यांनी २००९ ते २०१९ दरम्यान मालमत्तेत सर्वाधिक वाढ झालेल्या १० संसद सदस्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. २०१९ मध्ये बंगळुरू मध्य मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या मोहन यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ५.३७ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. १० वर्षांत हा आकडा ७५.५५ कोटी रुपयांपर्यंत गेला.

सुळे, बादल, वरुण गांधी यांचीही नावे -उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजप खासदार वरुण गांधी यांची संपत्ती २००९ मधील ४.९२ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये ६०.३२ कोटी रुपयांपर्यंत वाढली. भटिंडा येथील शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांची संपत्ती २००९ मधील ६०.३१ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये २१७.९९ कोटी रुपयांवर गेली. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांची संपत्ती २००९ मधील ५१.५३ कोटी रुपयांवरून २०१९ मध्ये १४०.८८ कोटी रुपयांवर गेली.  

टॅग्स :Member of parliamentखासदारMONEYपैसा