‘शस्त्र खरेदी प्रक्रिया गतिमान करणार’
By Admin | Updated: June 25, 2014 02:55 IST2014-06-25T02:55:37+5:302014-06-25T02:55:37+5:30
शस्त्र प्रणाली विकत घेण्याची प्रक्रिया मंद असणो ही चिंतेची बाब असल्याचे सांगून संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सशस्त्र दलांच्या गरजा भागवण्यासाठी खरेदी प्रक्रियेला गतिमान करणार असल्याचे सांगितले.

‘शस्त्र खरेदी प्रक्रिया गतिमान करणार’
>नवी दिल्ली : शस्त्र प्रणाली विकत घेण्याची प्रक्रिया मंद असणो ही चिंतेची बाब असल्याचे सांगून संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सशस्त्र दलांच्या गरजा भागवण्यासाठी खरेदी प्रक्रियेला गतिमान करणार असल्याचे सांगितले.
जेटली नौदल कमांडर परिषदेला उपस्थित होते. देशाच्या संपूर्ण स्नेतांना संरक्षणासाठी रक्कम उपलब्ध करणो अनिवार्य आहे, असे सांगून जेटली यांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची सशस्त्र दलांची मागणी मान्य करण्याचे संकेत दिले.
आवश्यक असलेले कोणतेही उपकरण असो, त्याची खरेदी प्रक्रिया अतिशय मंद गतीने पुढे सरकते. ही चिंतेची बाब आहे.
नौदलाने त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याची व खरेदी प्रक्रियेला गतिमान करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकार यासाठी निश्चित प्रयत्नशील राहील, असे जेटली म्हणाले. (वृत्तसंस्था)