शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:12 IST

काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने लोकांना देऊऩ आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

न्याय योजनेचं उद्देश देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देणे आहे त्याचसोबत देशातील अर्थव्यवस्था बिघडली आहे तिला पूर्वपदावर आणण्यासाठी या योजनेचा वापर होईल असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील नोटबंदी, जीएसटी अशा निर्णयांनी देशातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. असंघटीत क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. मागील 5 वर्ष नरेंद्र मोदींनी गरिबांना काहीच दिलं नाही, गरिबांना लुटण्याचं काम या सरकारने केले म्हणून हा योजनेचे नाव न्याय असं ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी शेतकरी, छोटे व्यापारी, बेरोजगार तरुण यांना देशोधडीला लावले, ज्या वंचित समाजाला लुटण्याचं काम मोदींनी केलं आम्ही त्या प्रत्येक घटकाला ते पुन्हा परत देणार आहोत. न्याय योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. सर्व अभ्यास करून ही योजना आणली आहे. न्याय योजना आणताना अर्थ विश्लेषक, या क्षेत्रातील तज्ज्ञ सगळ्यांचा अभ्यास करुनच घोषित केली आहे असंही राहुल यांनी सांगितले. न्याय योजना आणल्याने भाजपा घाबरली आहे. पंतप्रधानांनी आपलं काम व्यवस्थित केलं असतं तर गरिबी संपली असती मात्र तसं झालं नाही. न्याय योजनेने देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ मिळेल असा दावाही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर सडकून टीका केली. ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस