हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By Admin | Updated: September 30, 2016 09:44 IST2016-09-30T09:16:17+5:302016-09-30T09:44:52+5:30

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरुच आहेत. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

We will not improve! Rebirth of Pakistan Against Corruption | हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

>ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 30 - पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरुच आहेत.  गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री 12.30 ते 1.30च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
 
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचं कळत आहे. जसजशी वेळ सरकत आहे तसतसा तणाव वाढत चालला आहे. 
 
संबंधित बातम्या
सीमोल्लंघन!
उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच
 
आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे.
 
 

Web Title: We will not improve! Rebirth of Pakistan Against Corruption