शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:44 IST

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे.

रांची- राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाचे साडे तीन वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात आली.  21 वर्षांनंतर चारा घोटाळ्याचा निकाल लागला. लालू प्रसाद यांना जामीन मिळणार नाही, असंही कोर्टाने सांगितलं. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे. मी हार मानणार नाही. लालू प्रसाद यादव यांच्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आणि जामीन मिळवणारच, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

 

लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर राजदच्या भविष्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजदचं भविष्यात काय होणार? यावरूनही अनेक चर्चा होत आहेत. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडेल, अशीही शक्यता वर्तविली जाते आहे. पण, तेजस्वी यादव यांनी हे सर्व अंदाज चुकीचे ठरतील, असं म्हटलं आहे.

शनिवारी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्याच्या काही वेळ आधी तेजस्वी यादव यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. लालूप्रसाद यादव भाजपासोबत नाहीत म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी काही जुन्या जाणत्या राजकारण्यांसारखा लालची नाही, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी नाव न घेता नितीशकुमारांवर टीका केली. लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाल्याने सगळं संपेल, असा काही जणांना गैरसमज आहे. पण आमच्या पक्षातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी माझी जबाबदारी समर्थपणे पार पाडेन, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Fodder scamचारा घोटाळाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवHigh Courtउच्च न्यायालय