शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी खंबीरपणे मुकाबला करू - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:28 IST

मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.

अभिलाष खांडेकर -

भोपाळ : भारतातील जगप्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पातील नक्षलवाद्यांची समस्या कठोरपणे हाताळली जाईल, असे संकेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या २२व्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात त्यांनी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांची माहिती सरकारला मिळालेली आहे व अनेक ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.  व्याघ्र अभयारण्याच्या ८० टक्के जागेवर नक्षलींनी कब्जा केला आहे, याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. 

तथापि, मुख्यमंत्र्यांनी प्रथमच अधिकृतरित्या याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही समस्या फक्त कान्हातूनच नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेशातून हद्दपार करायची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी बालाघाट आणि परिसरातून काही नक्षल नेत्यांवर कारवाई केलेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.  मुख्य वन्यजीव रक्षक जे. एस. चौहान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कान्हामधील नक्षलवाद्यांच्या मुद्द्यावर सरकार वन विभागाशी समन्वय साधून सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे.

वाढते संघर्ष : मानव आणि जंगली हत्तींचे वाढते संघर्ष यावरही वन्यजीव मंडळाने चर्चा केली. आ. नरेंद्र सिंग यांनी हा मुद्दा उपस्थित करून म्हटले आहे की, सिधी, अनुप्पूर, उमारिया आदी भागांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. हत्तींचे कळप गावांमध्ये शिरून मालमत्ता व शेतीची नासधूस करत आहेत. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशnaxaliteनक्षलवादीBJPभाजपा