दुबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींच्या बसपाने केलेल्या महाआघाडीमध्ये काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नव्हते. दरम्यान, देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आज दुबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा उत्तर प्रदेशमधील महायुतीच्या प्रश्नाबाबत राहुल गांधी म्हणाले की, ''बसपा आणि सपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची शक्ती कशी वाढवायची याची जबाबदारी आमच्यावर आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पक्ष पूर्ण क्षमतेने निवडणूक लढू,''
सपा-बसपाने त्यांचा निर्णय घेतलाय, आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 22:25 IST
देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सपा-बसपाने त्यांचा निर्णय घेतलाय, आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू - राहुल गांधी
ठळक मुद्देसमाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढूउत्तर प्रदेशमध्ये पक्षाची शक्ती कशी वाढवायची याची जबाबदारी आमच्यावर पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, असे मला वाटले. मात्र पाकिस्तानकडून निरपराध भारतीयांविरोधात होणार हिंसाचार खपवून घेणार नाही