"मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू", सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तर
By Admin | Updated: June 8, 2017 14:56 IST2017-06-08T12:24:53+5:302017-06-08T14:56:14+5:30
एका व्यक्तीने सुषमा स्वराजांना आपण मंगळवार फसलो असल्याचं ट्विट करत पाय खेचण्याचा प्रयत्न केला

"मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू", सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नेहमी ट्विटरवर सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातूनच अनेकजण त्यांच्यासमोर आपली समस्या मांडत असतात. सुषमा स्वराजदेखील तात्काळ त्यावर कारवाई, उपाययोजना करत मदतीसाठी धाव घेत असतात. विशेष म्हणजे सुषमा स्वराज स्वत: तक्रारीची दखल घेत उत्तर देत असतात. मात्र अनेकजण त्यांच्या या चांगल्या वृत्तीचा फायदा घेत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीला सुषमा स्वराजांनी मिश्कीलपणे उत्तर देत त्यालाच तोंडघशी पाडलं.
एका व्यक्तीने सुषमा स्वराजांना आपण मंगळवार फसलो असल्याचं ट्विट करत पाय खेचण्याचा प्रयत्न केला. आपण मंगळवार फसलो असून मंगळयान - 2 केव्हा पाठवण्यात येणार आहे ? असं ट्विट त्याने केलं होतं. आपली खिल्ली उडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येताच सुषमा स्वराज यांनी संतापण्याऐवजी मिश्कीलपणे उत्तर देत सांगितलं की, तुम्ही मंगळावर जरी असलात तरीही भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी धावून येईल.
Even if you are stuck on the Mars, Indian Embassy there will help you. https://t.co/Smg1oXKZXD
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) June 8, 2017
अमेरिकेतील शिकागोत राहणा-या करण सैनी याने ट्विट केलं होतं की, "सुषमा स्वराज, मी मंगळावर फसलो आहे, 987 दिवसांपुर्वी मंगळयानातून जेवण पाठवण्यात आलं होतं जे संपलं आहे. मंगळयान 2 कधी पाठवण्यात येईल ?". करण सैनीने आपल्या या ट्विटमध्ये इस्त्रोलाही टॅग केलं होतं.
यावर सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं की, "तुम्ही मंगळावर जरी फसला असाल, तरीदेखील भारतीय दूतावास तुमची मद करेल". सुषमा स्वराज यांच्या उत्तरामुळे नेमकी फजिती कोणाची झाली हा विचार करण सैनी करत असेल.
Web Title: "We will bring it back even if it's on Mars", Ms. Schmidt's Mishkel Answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.