काश्मीरमधील असंतोष आम्हीच भडकाविला!
By Admin | Updated: July 29, 2016 05:20 IST2016-07-29T05:20:19+5:302016-07-29T05:20:19+5:30
सुरक्षा दलांच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा

काश्मीरमधील असंतोष आम्हीच भडकाविला!
कराची : सुरक्षा दलांच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईदने पाकिस्तान सरकारचा खोटेपणा उघडा पाडला.
काश्मीरमध्ये गेले तीन आठवडे खदखदणाऱ्या असंतोषामागे पाकचा हात आहे, या भारताच्या प्रतिपादनाचा इस्लामाबादमधील सरकार एकीकडे इन्कार करत असतानाच दुसरीकडे हाफीजने वणीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचे नेतृत्व लष्करच्या एका ‘अमीरा’ने (म्होरक्या) केल्याचे सांगितले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची री ओढत हाफीजने गरळ ओकली की, काश्मीरशिवाय पाक अपूर्ण आहे. अल्लाच्या कृपेने काश्मीर पाकचा भाग नक्की होईल. भारताचे तुकडे झालेले जगाला पाहायला मिळतील. वणीच्या मृत्यूनंतर पाकमधील फैसलाबादहून अनेक लोक काश्मीरमध्ये गेले. त्यापैकी काहींनी ‘हौतात्म्य’ही पत्करले, अशी फुशारकीही त्याने मारली. (वृत्तसंस्था)