शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: महाभारताचं युद्ध १८ दिवस चाललं, कोरोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवस चालेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 18:32 IST

Coronavirus कृपया घराबाहेर पडू नका; मोदींकडून पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतील लोकांशी संवाद साधला. महाभारताचं युद्ध १८ दिवस सुरू होतं. कोरोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवस सुरू राहील आणि त्यात विजयी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील जनतेशी संवाद साधत संपूर्ण देशाला दिशा दाखवण्याचं आवाहन केलं. महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं. आता कोरोनाविरोधात संपूर्ण देश लढतोय. २१ दिवसांत हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे. महाभारतातल्या युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपण कोरोनाविरोधात लढत आहोत. यामध्ये काशीच्या रहिवाशांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन असल्यानं काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलता शिकवू शकते. सहयोग, शांती, सहनशीलतेची शिकवण काशी देशाला देऊ शकते. साधना, सेवा, समाधानाचा धडा काशीवासी देशाला देऊ शकतात, असं मोदी म्हणाले. वाराणसीच्या लोकांशी संवाद साधताना मोदींनी काशीचं महत्त्व सांगितलं. काशीचा अर्थच शिव असा होतो. शिव म्हणजे कल्याण. शंकराच्या नगरीत, महादेवाच्या या नगरीमध्ये संकटाशी दोन हात करण्याचा मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य आहे, अशा शब्दांत मोदींनी काशीचं महात्म्य अधोरेखित केलं. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता लोकांनी घरातच थांबावं, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. सरकारनं कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लोकांनी घरातून बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्याचा हा सर्वात चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी