शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश यांच्या हत्येशी आमचा काही संबंध नाही - सनातन संस्थेने केला हत्येचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:07 IST

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे

ठळक मुद्देसनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहेडॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवल्याचा दावा

बेंगळुर - पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हिंदू कार्यकर्ते आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, परंतु म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खून हिंदू कार्यकर्त्यांनी केला असं मानणं चुकीचं आहे असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बेंगळुर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी केला आहे आणि लोकशाही मार्गाने जात कायदेशीर उपाय केले आहेत असा दावा राजहंस यांनी केला. गोवास्थित सनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष चौकशी समितीला सहकार्य करण्याची संस्थेची तयारी असल्याचेही राजहंस म्हणाले. गोव्यातील पोंडा या मुख्यालयात यावे आणि अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे त्यांनी सांगितले. या हत्येशी संदर्भात अद्याप पोलीसांनी संस्थेची चौकशी केली नसल्याचेही ते म्हणाले.

काही राजकीय नेते, ढोंगी मुक्त विचारसरणीचे लोक आणि पत्रकार हिंदुत्ववादी संघटनांवर लंकेश यांची हत्या केल्याचा बेछुट आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व वकिल संजीव पुनाळेकर यांनी असा आरोप केला आहे की, हिंदू जनजागृती समितीचे नेते डॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवण्यात आले आहे.गौरी लंकेश प्रकरणी तपास पथकानं नक्षली, कौटुंबिक कलह, मालमत्ता वाद, स्थानिक वाद आणि लंकेश यांना मिळत असलेला निधी या अंगानं चौकशी करायला हवी असं मत पुनाळकर यांनी व्यक्त केलं आहे. विशिष्ट बनावटीच्या पिस्तुलानं लंकेश यांची हत्या झाली यावरून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी संस्था व समिती या दोघांना गोवणं गैर असल्याचं ते म्हणाले.

दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या ज्या शस्त्रांनी झाली त्याबाबत उलटसुलट अहवाल असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. पोलीसांनीच यासंदर्भात उलट सुलट मतं व्यक्त केल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. विशेष तपास पथकाला सनातन संस्थेची चौकशी करायची असेल तर त्यास आम्ही तयार आहोत असं पुनाळेकर म्हणाले. तपास पथकं स्थानिक पोलीसांच्या मदतीनं काही साधकांना फोन करून माहिती घेत असल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशCrimeगुन्हा