शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत- गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:24 IST

अयोध्येतील कार्यक्रमात गडकरींचा दावा

अयोध्या: मोदी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुढील 200 वर्षे खड्डे पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे. रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे काम गेल्या 70 वर्षांमध्ये झालं नाही, ते आम्ही 5 वर्षांमध्ये केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. अयोध्येत पाच प्रकल्पांच्या भूमीपूजनानंतर ते बोलत होते. नितीन गडकरींनी काल 7195 कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचं भूमीपूजन केलं. हा कार्यक्रम जीआयसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. 'उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलत आहे. रस्ते सिमेंट आणि काँक्रिटचे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत. कारण आम्ही दर्जाशी कोणतीही तडजोड करणार नाही,' असं गडकरी म्हणाले. 'अयोध्या प्रभू रामाची नगरी आहे. गेल्या दौऱ्यात ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली, त्यांचं काम सुरू करण्यासाठी मी आलो आहे. आता ज्या प्रकल्पांचं भूमीपूजन झालं आहे, त्यावर पुढील दोन महिन्यात वेगानं काम सुरू होईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. अयोध्येत विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणाऱ्या नितीन गडकरींनी राम मंदिरावर बोलणं टाळलं. त्यांनी फक्त विकासकामांवर भाष्य केलं. 'अयोध्या छावणी ते मनकापूर गोंडापर्यंत 70 किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येईल. याचा आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय अयोध्येतील पाच नाल्यांची एसटीपीच्या मदतीनं सफाई करण्यात येईल,' असं गडकरी म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्या