शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत आणि बदलणारच, भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:23 IST

आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा उल्लेख आहे असं वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत 'आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी इथे आलो आहोत, आणि ती बदलणारच'

बंगळुरु - केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार आहे, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा उल्लेख आहे असं वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही लोकांना स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्याची लहर आली असल्याचं सांगत त्यांनी हे वक्तव्य केलं. 

अनंत कुमार हेगडे यांनी लोकांना अभिमानाने आपण मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, ब्राम्हण किंवा हिंदू आहोत असं सांगण्याचं आवाहन केलं आहे. 'अनेकांना ज्यांना आपल्या साध्या कुटुंबाची माहिती नसते, ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधत असतात. त्यांची स्वत:ची काही ओळखच नसते. त्यांना आपल्या पुर्वजांची काहीच माहिती नसते, पण हेच लोक स्वत: ला बुद्धिजीवी म्हणवतात', असं ते म्हणाले आहेत. 

'काही लोकांचं म्हणणं आहे की, राज्यघटनेनं आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला आहे, आणि तो आपण स्विकारला पाहिजे. आम्ही राज्यघटनेचा आदर करु, पण याच राज्यघटनेत अनेकदा बदलही करण्यात आले आहेत, आणि भविष्यातही होतील. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी इथे आलो आहोत, आणि ती बदलणारच', असं अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत. 

कर्नाटक काँग्रेसने अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून भाजपा पक्ष त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का अशी विचारणा केली आहे. 'अनंत कुमार हेगडे यांनी राज्यघटना वाचलेली नसावी. त्यांना संसदीय आणि राजकीय भाषेची जाण नाही. देशातील प्रत्येक नागरिक भारतीय आहे आणि प्रत्येक धर्माला समान हक्क आणि संधी आहे हे त्यांना माहित असावं', अशी टीका मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी केली आहे. 

अनंत कुमार हेगडे पाच वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलात त्यांना स्थान देण्यात आलं होतं. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे पक्षाचा प्रचार आणि वजन वाढण्याच्या हेतूने त्यांना संधी देण्यात आली होती. 

अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रीपद दिल्यानंतर ते वादात आले होते. सिद्धरमय्या यांच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयर नोंद करण्यात आला होता. तसंच डॉक्टराला कानाखाली मारतानाचं त्यांचं सीसीटीव्ही फुटेजही चांगलंच व्हायरल झालं होतं. खाली पडल्याने जखमी झालेल्या आपल्या आईकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागात त्यांनी डॉक्टरला मारहाण केली होती. 

नोव्हेंबरमध्ये त्यांनी कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या टीपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी टीपू सुलताना हा हिंदू विरोधी राजा असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला होता.

 

टॅग्स :BJPभाजपा