दलितांची सांगड कुत्र्याशी घालणा-या नेत्याला आम्ही हाकललं असतं - राहूल गांधी
By Admin | Updated: October 26, 2015 13:47 IST2015-10-26T13:47:16+5:302015-10-26T13:47:16+5:30
जर कुत्र्याची सांगड दलितांशी आमच्या एखाद्या नेत्यांनी मनात जरी घातली असती तरी आम्ही अशा नेत्याला काँग्रेसमधून बाहेर काढलं असतं असं सांगत, राहूल गांधींनी

दलितांची सांगड कुत्र्याशी घालणा-या नेत्याला आम्ही हाकललं असतं - राहूल गांधी
>ऑनलाइन लोकमत
मोतीहार (बिहार), दि. २६ - जर कुत्र्याची सांगड दलितांशी आमच्या एखाद्या नेत्यांनी मनात जरी घातली असती तरी आम्ही अशा नेत्याला काँग्रेसमधून बाहेर काढलं असतं असं सांगत, राहूल गांधींनी बिहारमधल्या प्रचारसभेत व्हि. के. सिंग व भाजपावर जोरदार टीका केली. व्हि. के. सिंग यांनी हरयाणातील दलित हत्याकांडासंदर्भात केलेले वक्तव्य महागठबंधन बिहारमध्ये भाजपाच्या विरोधी प्रचार रणनीतीचा भाग म्हणून वापरत आहे.
नरेंद्र मोदी केवळ विदेश दौ-यांमध्ये व्यस्त असून त्यांना देशातल्या गरीबांशी काहीही देणघेणं नसल्याची जुनीच टीका राहूल गांधींनी केली आहे. तसेच बिहारमधले लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात जातात, तेव्हा भाजपाचे स्थानिक नेते त्यांना मारहाण करतात आणि भाजपाचे वरीष्ठ नेते हस्तक्षेप करत नाहीत असा आरोपही राहूल गांधींनी पुन्हा केला आहे.