शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 3, 2020 17:37 IST

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

नवी दिल्ली -केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू आहे. विज्ञान भवनात सुरू असलेल्या या बैठकीत शेतकरी आपल्या समस्या मुद्देसूदपणे मांडत आहेत. मीळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकरी एका-एका मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत आहेत. या बैठकीला कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल हेदेखील उपस्थित आहेत. चर्चेनंतर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा नरेंद्र तोमर यांनी बैठकीपूर्वीच व्यक्त केली आहे.

चर्चेदरम्यान झालेल्या लंच ब्रेकमध्ये या शेतकऱ्यांनी सरकारने दिलेले जेवण आणि चहादेखील नाकारला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेले जेवणच घेतले. एका शेतकरी नेत्याने म्हटले आहे, "सरकारने आम्हाला जेवण आणि चहा ऑफर केला होता, मात्र, आम्ही त्यास नकार दिला आणि आमच्या सोबत असलेले जेवणच घेतले."

विज्ञान भवनातील या व्हिडिओमध्ये, बैठकीसाठी आलेले शेतकरी, आपल्या सोबत आणलेले भेजन एकमेकांना वाढताना दिसत आहेत. हे शेतकरी आंदोलक राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत, नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यातील अधिकांश शेतकरी पंजबमधील आहेत. जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे. 

शेतकऱ्यांच्या 6 मोठ्या मागण्या - 

  • तीनही कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. 
  • शेतकऱ्यांसाठी MSP कायदा बनवण्यात यावा. 
  • MSP निश्चित करण्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्यूला लागू करण्यात यावा.
  • NCR रीजनमध्ये हवा प्रदूषण कायद्यातील बदल परत घेण्यात यावेत.
  • शेतीसाठी डिझेलचे दरात 50 टके कमी करावेत.
  • देशभरात शेतकरी नेते, कवी, वकील तथा इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.मार्ग निघेल?शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. यापूर्वी 1 डिसेंबरला सरकार आणि शेतकरी एका टेबलवर आले होते. मात्र, चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती. यामुळे आता सरकारने आपल्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत आणि त्यांना यासंदर्भात पूर्ण हमी हवी आहे. तसेच आजच्या बैठकीत कसल्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही, तर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होईल आणि त्याचा शेवट काय असेल हे कुणालाही माहीत नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार