शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

३६ कोटींहून १४२ कोटी झालो आपण; हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्माची किती लोकसंख्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 20:53 IST

यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे

नवी दिल्ली - भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. लोकसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या आयोगाने जारी केलेल्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहचली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटींवर आहे. त्याचा अर्थ या दोन्ही देशातील लोकसंख्येत केवळ २९ लाखांचे अंतर आहे. 

UNFPA ने १९५० साली लोकसंख्या गणना सुरू केली होती. भारताची पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली. त्यावेळी देशाची लोकसंख्या ३६ कोटी इतकी होती. यूनाइटेड नेशन्सने याआधी अंदाज लावला होता की, एप्रिल महिन्यात भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनेल. देशातील लोकसंख्येत ४० टक्क्याहून अधिक २५ वर्षापेक्षा कमी प्रमाण आहे. सर्वात जास्त लोकसंख्या १०-२४ वयोगटातील आहे. जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. काही लोक हे मोठं संकट असल्याचं बोलतायेत तर काहीजणांनी ही संधी असल्याचे म्हटलं आहे. लोकसंख्येबाबत सर्व पैलू जाणून घेऊया. 

युवकांचा देश भारत यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे. १८ टक्के १०-१९ वयोगटातील, २६ टक्के १०-२४ वयोगटातील, जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. ६५ च्या वरील लोकसंख्या केवळ ७ टक्के लोक आहे. चीनपेक्षा भारताची कामगिरी चांगली आहे. महिलांचे प्रमाण ८२ आणि तर पुरुषांचे प्रमाण ७६ वर्ष आहे तर भारतात हा आकडा ७४ आणि ७१ आहे. भारतातील लोकसंख्या प्रत्येक राज्यात वेगळी आहे. केरळ, पंजाबमध्ये वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेशात युवकांची संख्या अधिक आहे. 

कोणाची किती लोकसंख्या?सर्व प्रमुख धर्माची लोकसंख्या वाढली आहे. १९५१ पासून हिंदू ३० कोटींहून ९६ कोटी झालेत. मुस्लिम ३.५ कोटींहून १७.२ कोटी, ईसाई ८० लाखांहून २.८ कोटी, भारतात लोकसंख्येबाबत काही ठोस सांगणे कठीण आहे कारण देशात शेवटची जनगणना २०११ मध्ये झालीय. भारतात लोकसंख्येच्या ४० टक्के २५ वर्षाहून कमी वयाच्या लोकांची आहे. अमेरिका आणि चीनसारखे देशात वेगाने लोकसंख्या वृद्धात्वाकडे जात आहे. परंतु भारत तरूण होत चाललाय. 

१६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट सुरू होईलभारतातील २५ टक्के लोकसंख्या ०-१४ (वर्षे) वयोगटातील आहे, १८ टक्के १० ते १९ वयोगटातील, २६ टक्के १० ते २४ वयोगटातील, ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील आहे आणि लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. विविध संस्थांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या सुमारे तीन दशकांपर्यंत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. १६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम