शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला", वित्त आयोग अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:30 IST

Arvind Panagariya on PM Modi: १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर बोटं ठेवलं. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारकडून पंतप्रधान मोदी यांना नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. पण, भारताने विकास करण्यासाठी खूप काम केले. यापेक्षाही अधिक काम करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने नियंत्रणात आणली गेली आहेत, असे भाष्य १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना अरविंद पानगरिया म्हणाले, "आपण विसरून जातो की, वास्तविकता पंतप्रधान मोदी यांना एका नाजूक अवस्थेत असलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला होता. यूपीए सरकारची शेवटची दोन-तीन वर्षात गोष्टी बिघडल्या होत्या. हे सगळं सगळ्यात वाईट कायदे बनवल्यामुळे घडलं होतं."

"आम्ही शिक्षणाचा अधिकार कायदा आणला, जो गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यात अडथळा ठरू लागला आणि आम्ही भूसंपादन कायदा आणला, ज्यामुळे नंतर आलेल्या पंतप्रधानांना काम करणे कठीण बनले. कारण जमिनीची किंमत खूप जास्त करून ठेवली गेली होती", असे अरविंद पानगरिया यांनी सांगितले. 

"रस्त्यासारख्या प्रोजेक्टमध्ये जमीन खरेदी एकूण प्रोजेक्टच्या किंमतीपैकी तीन चतुर्थांश पैसे खर्च होतात. याचा अर्त हाच की, ज्या पैशांमध्ये २ किमी रस्ता बनू शकला असता, त्यात तुम्ही फक्त १ किमी रस्ता तयार करता येत आहे", असे अरविंद पानगरिया म्हणाले.

विकासाला गती देण्याच्या मुद्द्यावर बोलताना पानगरिया यांनी सांगितले की, "रेल्वे आणि नागरी उड्डाण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल व्यवहाराशी संबंधित इतर पायाभूत सुविधांवरही लक्ष्य दिलं गेलं पाहिजे. विकसित भारत हे स्वप्न सत्यात येऊ शकतं. मागील २० वर्षात म्हणजे २००३-०४ ते २०२२-२३  पर्यंत विचार केला तर भारताचा जीडीपी वाढीचा दर १०.२ टक्के आहे. लोकांना जाणीव नाहीये की, डॉलरच्या तुलनेत आपण जास्त वेगाने विकास गेला आहे."

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग