शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही देवळात येऊन आम्हाला भ्रष्ट का करता?; भाजपा आमदाराचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 16:00 IST

आम्हाला मशीद किंवा मंदिरामध्ये जाण्याचा हक्क नाही.

देहरादून: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या रामपूर येथील मंदिरात घडलेल्या एका प्रसंगावरून स्थानिक राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. येथील एका मंदिरात एक मुस्लिम युवक हिंदू तरूणीसोबत आला होता. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. आणखी काही काळ तरूण जमावाच्या ताब्यात राहिला असता तर जमावाने कदाचित त्याला ठार मारले असते. मात्र, याठिकाणी तैनात असलेले पोलीस निरीक्षक गगनदीप सिंग यांनी धाडस दाखवून तरूणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. यावेळी संतप्त झालेला जमाव पोलिसांना जुमानत नव्हता. काहीही करून संतप्त जमावाला तरुणाला मारायचेच होते. परंतु, पोलीस अधिकारी गगनदीप सिंग शेवटपर्यंत न डगमगता उभे राहिले व या तरुणाला जमावाच्या तावडीतून सुखरूप सोडवले. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राजकुमार ठकुराल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्हाला (हिंदू) मशिदीत किंवा मदरशांमध्ये जाण्याचा हक्क नाही. मग ते (मुस्लिम युवक) मंदिरात येऊन आमचा धर्म का भ्रष्ट करू पाहतात? असा सवाल राजकुमार ठकुराल यांनी विचारला. प्रशासन किंवा कायदा कोणीही यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, आता अशा लोकांना धडा शिकवायची वेळ आली आहे. प्रशासन आणि पोलीस वेळीच जागे झाले नाहीत तर आम्हाला आमच्या पद्धतीने हे सर्व हाताळावे लागेल, असे ठकुराल यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम