शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही आधार कार्डच्या सुरक्षेची आम्ही 100% खात्री देऊ शकत नाही; केंद्राचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 11:05 IST

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली: आधार कार्डची माहिती अवघ्या काही रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याच्या वृत्तानं काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ माजली होती. आधार कार्डच्या माध्यमातून मिळवण्यात आलेली नागरिकांची माहिती सरकारकडे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला होता. याप्रकरणी आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय) दिलेल्या माहितीमुळे पुन्हा एकदा आधारच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. 'आधार कार्डचा डेटा लिक होऊ नये, याची काळजी आम्ही घेऊ. मात्र आम्ही याबद्दल 100 टक्के खात्री देऊ शकत नाही,' असं सर्वोच्च न्यायालयात यूआयडीएआयकडून सांगण्यात आलं आहे.यूआयडीएआयकडून वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. यावेळी आधार कार्डच्या गोपनीयतेबद्दल सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर स्पष्टीकरण देताना, आधार कार्डच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली माहिती सुरक्षित असल्याचा दावा द्विवेदी यांनी केला. 'बायोमेट्रिक डेटा कोणासोबतही शेअर केला जात नाही. ज्या व्यक्तीचं आधार कार्ड आहे, त्या व्यक्तीच्या संमतीविना त्याचा डेटा कोणालाही दिला जात नाही,' असं द्विवेदी यांनी सांगितलं. 'आधार कार्डची माहिती लिक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मात्र याबद्दल 100 टक्के खात्री देऊ शकत नाही,' असंही ते पुढे म्हणाले. आधार कार्डचा संबंध फेसबुक डेटा लिक प्रकरणाशी जोडू नये, असंही राकेश द्विवेदी यांनी यूआयडीएआयच्या वतीनं सांगितलं. 'या प्रकरणाला कृपया केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणाशी जोडू नका. आधारकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात नाही. आधार कार्डची माहिती सुरक्षित नसल्याची भीती जाणूनबुजून पसरवली जात आहे. आधार कार्ड इंटरनेटशी जोडण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोणीही याची माहिती ऑनलाईन मिळवू शकत नाही,' असं द्विवेदींनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय