शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपण सर्वच तोडू शकतो कोरोना संसर्गाची साखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 06:18 IST

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची विशेष मुलाखत

एस. के. गुप्ता।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपण सगळे मिळून कोरोनाची साखळी तोडू शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्णत: मास्क, फेस कव्हर अथवा रुमालांचा वापर करावा लागेल. घराबाहेर पडताना हे विसरू नका. डिस्टन्सिंगचे पालन करा. याद्वारेच या महामारीवर विजय प्राप्त केला जाऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोनाशी संबंधित अनेक बाबींचा ऊहापोह केला.

कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला असला तरी नवे कंटेन्मेंट झोनही सातत्याने वाढत आहेत. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त उपायांमुळे रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे. आतापर्यंत ८ लाख १८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.कोरोना लसीबाबत कधी १५ आॅगस्ट, तर कधी डिसेंबर २0२0 च्या तारखा सांगितल्या जात आहेत. नेमका किती काळ लागेल, याबाबत ते म्हणाले की, अनेक देश लस वा औषध बनविण्याच्या कामाला लागले आहेत. भारतातील दोन कंपन्या नैदानिक परीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात आहेत. चीनची एक कंपनी अंतिम अनुमतीजवळ पोहोचली आहे. ब्रिटनची एक कंपनी तिसऱ्या टप्प्यात आहे. अमेरिकेची एक कंपनी दुसºया टप्प्यात आहे. जगात एकूण २३ उमेदवार नैदानिक टप्प्यात आहेत. १४0 उमेदवार पूर्व नैदानिक स्थितीत आहेत.

उपचार व टेस्टिंगसाठी लाखोंची बिले दिली जात आहेत, यावर आरोग्यमंत्री म्हणाले की, सुरुवातीला खाजगी केंद्रांवर अधिक तपासणी शुल्क आकारले गेले. याबाबत राज्य सरकारांना चौकशीचे आदेश देण्यात आले. केंद्राने कोरोना योद्ध्यांसाठी ५0 लाखांची तरतूद केली आहे. अध्यादेश जारी करून डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाºयांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद केली आहे.त्यांनी माहिती दिली की, देशात १२८४ प्रयोगशाळा आहेत. भारतात आधी पीपीई कीट व एन-९५ मास्क आयात केले जात. परंतु आज पीपीई कीट व मास्क बनवण्यातही आम्ही आत्मनिर्भर आहोत. चाचणीसाठीच्या १२८४ पैकी ३८९ प्रयोगशाळा खासगी क्षेत्रातील आहेत. सरकारी प्रयोगशाळांत मोफत तपासणी केली जाते. खाजगीमध्ये किती शुल्क घ्यावे याचे नियम निश्चित केले आहेत. आमच्या मंत्रालयाने सुरू केलेल्या १०७५ व ९१-११-२३९७९०४६ या हेल्पलाईनवर प्रत्येक कॉल ऐकला जातो. सर्वसामान्यांचे जनजीवन कधी रुळावर येईल याबाबत काही अंदाज व्यक्त करता येईल का, याबाबत ते म्हणाले की, लॉकडाऊन १.० पासून ४.० दरम्यान जनहितार्थ निर्बंध लावण्यात आले होते. आता अनलॉक १.० व २.० मध्ये फारच कमी निर्बंध बाकी आहेत. हळूहळू तेही हटवण्यात येतील.सामूहिक प्रयत्नांतून धारावीत यशजागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलची प्रशंसा केलेली आहे. याबाबत ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक आंतरराष्टÑीय संघटनांनी केवळ धारावी मॉडेलच नव्हे, तर आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत नियंत्रण मिळवणे एवढे सोपे नव्हते; परंतु सामूदायिक किचन, तयार जेवण, साफसफाई, किराणासह सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा, ट्रेस-टेस्ट-ट्रीट हे सूत्र व केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार सरकार, स्वयंसेवी संस्था, निर्वाचित लोकप्रतिनिधी व स्थानिक निवासींमधील ताळमेळ यामुळे हे शक्य झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या