शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर भारत- बांगलादेश यांच्या संबंधातील सुवर्ण अध्याय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 15:19 IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या उपस्थितीत बांगलादेश भवनाचे उद्घाटन

शांतीनिकेतन- भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांच्या सुवर्ण अध्यायाची निर्मिती आपण करत आहोत अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या सुधारलेल्या नात्याबद्दल मत व्यक्त केले. दोन्ही देशांना त्रासदायक वाटणारे अनेक प्रश्न सुटले आहेत आणि काही प्रश्न लवकरच सुटण्याच्या मागार्वर आहेत असेही पंतप्रधानांनी यावेळेस सांगितले.अनेक समस्या इतक्या वर्षांमध्ये प्रलंबित होत्या. त्या सुटणे असंभव मानले जात होते. मात्र आम्ही दोन्ही देशांनी सहमतीने त्यावर उत्तरे शोधली आहेत. 1965 (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) पासूनच दोन्ही देशांना जोडणाऱ्या मार्गांचा प्रश्न होता. मात्र आता आम्ही सर्व शक्य त्या मार्गांनी दोन्ही देशांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कोलकाता ते खुलना अशी एसी बससेवा सुरु केलेली आहे. विश्व भारती विद्यापिठामध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनाच्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेदही उपस्थित होत्या.शेख हसिना वाजेद यावेळेस बोलताना म्हणाल्या, रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून बांगलादेश सरकारने आश्रय दिला आहे. त्या लोकांना म्यानमारने परत बोलवावे यासाठी भारताने म्यानमारवर दडपण आणले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. "जवळपास 11 लाख रोहिंग्या बांगलादेशात राहात आहेत. आम्ही त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आसरा दिला आहे. आपल्या देशातल्या 16 कोटी लोकांबरोबर आणखी सात ते आठ लाख लोकांचे पालन तू करु शकतेस का असं माझी बहिण रेहानाने विचारलं होतं. तरिही मी रोहिंग्यांना म्यानमारने परत घ्यावे यासाठी म्यानमारवर दडपण आणण्यास मी तुमची मदत मागते." असे  त्या म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन भारत आणि बांगलादेश यांच्यामधील भूसीमेचा करार पूर्णत्त्वास नेला तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू होते अशा शब्दांमध्ये त्यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यामधील कराराबद्दल भावना मांडल्या. जगभरामध्ये एनक्लेव्हजची देवाणघेवाण करण्यासाठी युद्धं झालेली आपण पाहिली आहेत मात्र भारत आणि बांगलादेशाने मात्र शांततामय मार्गाने एन्क्लेव्हजची देवाणघेवाण केली असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदीRohingyaरोहिंग्याEnclaveएन्क्लेव्हIndiaभारत