शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 13:41 IST

Senior virologist Shahid Jameel resigned: INSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप.

ठळक मुद्देINSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप.प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी वैज्ञानिकांच्या सल्लागार समुहाचा दिला राजीनामा. 

वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील (Virologist Shahid Jameel) यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार समुहाच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. शाहिद जमील हे केंद्र सरकारने तयार केलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जिनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक भारतीय म्यूटेंटबाबत माहिती दिली होती. परंतु सरकारनं यावर लक्ष दिलं नाही," असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला. "INSACOG जो एक सरकारी वैज्ञानिक सल्लागार समूह आहे, त्याचे अध्यक्ष एस. जमील यांनी आपला राजीनामा दिला आहे. INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीला पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक म्युटेंटबाबत इशारा दिला होता. परंतु सरकारनं यावर लक्षचं दिलं नाही. सरकारनं विज्ञानाला महत्त्व दिलं नाही असं जमील यांनी उघडपणे सांगिलं. आपण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत," असं ओवेसी म्हणाले.कोरोना संकटात मोठी जबाबदारीकोरोना संकटात केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना कोरोनाचे जीनोम स्ट्रक्टर ओळखण्याच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र, त्यांनी रविवारी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा का दिला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित धोरण बनवण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहोत. या लेखातून त्यांनी मोदी सरकारला वैज्ञानिकांचे म्हणणे ऐका, तसेच कोरोना विषयक धोरण बनवताना जिद्दीपणा सोडण्याचा सल्ला दिला होता. याचबरोबर एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून कोरोना आणि लसीकरण यावर नजर ठेवून होतो. माझ्या अंदाजानुसार कोरोनाचे अनेक व्हेरिअंट पसरत आहेत. हेच कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीscienceविज्ञान