शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी, मतदार नाही’; परप्रांतीयांना गोव्यातील मतदानात इंटरेस्ट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:29 IST

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मणिपूर, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, तसेच नेपाळमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय गोव्यात राहतात.

राजेश निस्ताने -

पणजी : आधीच भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या गोवा राज्यात स्थानिकांचा टक्का किती? असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. त्यात तथ्यही आहे. कारण गोव्यात मूळ रहिवासी कमी आणि परप्रांतीयांचा भरणा अधिक, असा असमतोल निर्माण झाला आहे. त्यातही या परप्रांतीयांना गोव्यातील निवडणूक, मतदान आणि निकालात कोणताही इंटरेस्ट नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून पुढे आले.उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मणिपूर, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, तसेच नेपाळमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय गोव्यात राहतात. नामांकित कंपन्यांपासून तर हॉटेल, पर्यटन, सुरक्षारक्षक, सफाई कामगार अशा सर्वच क्षेत्रांत परप्रांतीय नागरिक आहेत; परंतु, पैसा कमवा आणि कुटुंबाची उपजीविका चालवा, एवढाच त्यांचा दिनक्रम दिसतो.गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाबाबत विविध घटकांत काम करणाऱ्या परप्रांतीयांना बोलते केले असता ‘आम्ही केवळ गोव्याचे रहिवासी आहे, मतदार नाहीत,’ असाच एकूण सूर त्यांच्या चर्चेतून पुढे आला. मतदानच करायचे नाही तर कोण कोणत्या पक्षाकडून उभा आहे याच्या खोलात जायचेच कशाला, असा उलट प्रश्न एकाने केला. २० ते २५ वर्षांपासून अनेक जण गोव्यात वास्तव्य करीत आहेत. त्यांची मुलेही येथेच लहानाची मोठी झाली; पण त्यांनी आपले नाव गोव्याच्या मतदार यादीत येणार नाही याची सातत्याने काळजी घेतली. शेवटी केव्हा तरी गावाकडेच (अपने देश) जायचे आहे असा विचार करून त्यांनी आपले नाव गावाकडील मतदार यादीतच कायम ठेवले. रेशनवरील धान्य व इतर शासकीय योजनांचा लाभ ते तिकडेच घेतात. आपल्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांवर मात्र परप्रांतीय नागरिक गोव्यातून वॉच ठेवतात.  उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काय चित्र राहील ते विचारा; पण गोव्याचे काहीच विचारू नका, अशी भूमिकाच एका सलून व्यावसायिकाने मांडली.

महाराष्ट्रातील नेते ‘डोअर टू डोअर’ प्रचाराने त्रस्त-    गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख पक्षांचे अनेक नेते गोव्यात आले आहेत; परंतु येथे ‘डोअर टू डोअर’ प्रचाराच्या पद्धतीमुळे ही नेते मंडळी त्रस्त झाली आहेत.-    सर्वच पक्षांकडून दोन डझनावर नेते-पदाधिकारी गाेव्यात आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आले आहेत. -    गोव्यात जाहीर सभा, कॉर्नर सभांचे फॅड नाही. दिल्लीतून आलेल्या व्हीव्हीआयपींच्या सभेलाही दीड ते दोन हजारांची गर्दी खूप झाली. -    घरोघरी प्रचार हीच पद्धत येथे रूढ आहे. तेही मतदारांच्या सोयीने जावे लागते. मात्र, हे घरोघरी प्रचाराला जाणे नेत्यांच्या पचनी पडलेले दिसत नाही. -    आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघात कधी ‘डोअर टू डोअर’ गेलो नाही, गोव्यात कसे जावे, असा सवाल ही नेते मंडळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी