‘आघाडी तुटण्यासाठी आम्ही जबाबदार नाही’
By Admin | Updated: October 1, 2014 02:09 IST2014-10-01T02:09:02+5:302014-10-01T02:09:02+5:30
आघाडी जागावाटपाच्या मुद्यावरून तोडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा शरद पवार यांनी केलेला आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी फेटाळून लावला.

‘आघाडी तुटण्यासाठी आम्ही जबाबदार नाही’
>जम्मू : महाराष्ट्रात 15 वर्षापासून राष्ट्रवादीसोबत असलेली आघाडी जागावाटपाच्या मुद्यावरून तोडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा शरद पवार यांनी केलेला आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी फेटाळून लावला. आम्ही कुणीही आघाडी तोडण्यामागचे कारण ठरत नाही. मी, राहुल आणि काँग्रेसही त्यासाठी जबाबदार नाही, असे त्या येथे पत्रकारांना उत्तर देताना म्हणाल्या. काँग्रेसमुळेच आघाडीत फूट पडल्याचे विधान पवारांनी केल्याबद्दल सोनिया गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने दीर्घकाळापासून संपुआ आघाडीतील घटक पक्षांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न चालविल्याचे माङया निदर्शनास आले आहे, असेही पवार म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
च्अजित पवार हेच आघाडी तोडण्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला होता. आघाडीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या
फैरी झाडत प्रचाराचा धुरळा उडविला आहे.