लोकांचा कौल आम्ही स्वीकारतो - केजरीवाल
By Admin | Updated: March 12, 2017 00:54 IST2017-03-12T00:54:21+5:302017-03-12T00:54:21+5:30
पंजाब आणि गोव्यात अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे आम आदमी पार्टीत निराशा पसरली आहे. तथापि, पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल

लोकांचा कौल आम्ही स्वीकारतो - केजरीवाल
नवी दिल्ली : पंजाब आणि गोव्यात अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे आम आदमी पार्टीत निराशा पसरली आहे. तथापि, पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मात्र आपण जनतेचा कौल स्वीकारत आहोत, यापुढेही पक्षाचा संघर्ष सुरूच राहील, असे म्हटले आहे.
केजरीवाल यांनी ट्विटद्वारे निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘आम्ही जनादेश स्वीकार करतो. सर्व कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत केली आहे. आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहील.’ आम आदमी पार्टीने पंजाब आणि गोव्यात सर्व शक्ती पणाला लावली होती. केजरीवाल यांनी स्वत: पंजाबात ९५ सभा घेतल्या.