शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:29 IST

Wayanad Lok Sabha By Election: वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच प्रियंका गांधी यांनी रोड शो करत वायनाडमधील मतदारांना अभिवादन केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळाल्यानंतर वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तिथे काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. दरम्यान, आज प्रियंका गांधी यांनी रोड शो च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सकाळी ११ वाजता कलपेट्टा न्यू बस स्टँड येथून रोड शो ला सुरुवात केली. या रोड शोनंतर प्रियंका गांधी यांनी सभेला संबोधित केले.

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की,  मागच्या ३५ वर्षांपासून मी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी प्रचार करत आहे. आता मी पहिल्यांदाच तुमच्या पाठिंब्याची मागणी करण्यासाठी इथे आले आहे. ही एक वेगळी जाणीव आहे. मला वायनाड येथून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिल्याबद्दल मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाड