शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

८00 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर, एआयसीटीई अध्यक्षांनीच दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:54 AM

देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे.

बेंगळुरू : देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थी प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत, असे आढळून आले आहे.एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे ८00 महाविद्यायले बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरवर्षी सुमारे १५0 अभियांत्रिकी महाविद्यालये एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात आणिसलग पाच वर्षे ज्या महाविद्यालयांतील ३0 टक्क्यांहून अधिक जागाभरल्या जात नाहीत, ती बंद करायला हवीत, असा एआयसीटीईचा नियमच आहे.बेंगळूरूमध्ये एका कार्यक्रमात अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाइटनुसार २0१४-१५ ते २0१७-१८ या काळात देशातील सुमारे ४१0 अभियांत्रिकी महाविद्यालयांना बंद करण्याची संमती देण्यात आली.त्यात कर्नाटकातील २0 आहेत. सन २0१६-१७ मध्ये सर्वाधिकअभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)दर्जा नसलेल्याचा परिणाम...कॉलेज बंद पडणा-यांत तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. काहींनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये बंद करण्याची परवानगी एआयसीटीईकडे मागितली आहे.ज्या संस्थाचालकांना अभियांत्रिकी महाविद्यालये चालवता येत नाही, त्यांना ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रूपांतर पॉलीटेक्निक किंवा विज्ञान वा कला महाविद्यालयात करतात. टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेण्याची सोय सुरू ठेवणेमहाविद्यालयांचा दर्जा, तेथील शिक्षणाचा नोकरीसाठी होणारा उपयोग ही महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हाही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी शिकवतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील, असे अभियंते घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.बंद होणारी महाविद्यालयेतेलंगणा 65महाराष्ट्र 59उत्तर प्रदेश47तामिळनाडू31हरयाणा31राजस्थान 30आंध्र प्रदेश29गुजरात29कर्नाटक 21मध्य प्रदेश 21पंजाब19

टॅग्स :Studentविद्यार्थी