शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील जखनी गावाची पाणीदार कथा; लोकसहभागातून जलसमृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:02 IST

निर्मला देशपांडे यांनी दाखविला मार्ग; बेरोजगारी, स्थलांतरावर केली मात

भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : पद्मविभूषण निर्मला देशपांडे यांनी दाखविलेल्या सर्वोदय परिवाराच्या मार्गावर चालले तर काय होऊ शकते हे उत्तर प्रदेशातील जखनी गावाने दाखवून दिले आहे. सरकारी निधीशिवाय गावाने लोकसहभागातून जलसमृद्धी मिळविली. बेरोजगारी, स्थलांतर, उपासमार यासह अनेक समस्यांवर गावाने मात केली असून, आता याच गावासारखे काम देशभरात साकारण्याचे काम सुरू आहे.बुंदेलखंड परिसरात २००१ ते २००३ या काळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना समजले. जखनी गावचे सामाजिक कार्यकर्ते उमाशंकर पांडे २००५ मध्ये दीदींना भेटायला आले.

दीदींनी त्यांची भेट तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून दिली. ‘तुम्ही तुमचे गाव जलग्राम बनवा’, असे डॉ. कलाम यांनी सांगितले. वनराईचे संस्थापक मोहन धारिया व जलतज्ज्ञ अनुपम मिश्रा यांचीही भेट दीदींनी करून दिली. त्यानंतर पांडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रत्येकाने पाणी बचतीचे काम केल्यास आदर्शवत काम उभे राहील, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकºयाने शेतातच बांध घातले आणि बांधांवर झाडे लावली. तीन वर्षांनंतर त्या बांधांमुळे पावसाचे पाणी शेतातच जिरायला लागले. त्यातून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गावातून स्थलांतर थांबले.

अडीच हजार लोकसंख्येच्या गावाने जलसमृद्धी मिळवली. अडीच हजार क्विंटल बासमती तांदळाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. रबीच्या हंगामात गहू, हरभरा, तीळ, मूग, उडीद ही पिके घेतली जात आहेत. गावातील भूजल पातळी दहा फुटांवर आली आहे. परिसरातील ग्रामस्थांनीही आता जखनीचा आदर्श घेत काम सुरू केले आहे. दीदींनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आम्ही हे करू शकलो. मात्र, आज समृद्धी पाहण्यासाठी त्या हयात नाहीत, असे पांडे सांगतात.निती आयोगाकडून दखलनीती आयोगाने ‘जल व्यवस्थापन २०१९’ या अहवालात गावाची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘मन की बात’मध्ये गावाचे कार्य देशवासीयांना सांगितले. केंद्र सरकारने २०१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशी दोन जलग्राम साकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासारखी अनेक गावे आता जलग्राम होत आहेत.

टॅग्स :Waterपाणी