पत्नीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली वॉटरप्रूफ साडी
By Admin | Updated: January 21, 2016 13:12 IST2016-01-21T12:02:43+5:302016-01-21T13:12:05+5:30
नवरेमंडळी महागडया साडया खरेदी करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाही याला अपवाद नाहीत. त्यांनीही आपल्या पत्नीवरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली.

पत्नीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली वॉटरप्रूफ साडी
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २१ - बहुतांश स्त्रियांना दागिने, साडया प्रिय असतात. नव-याने नवीन साडी आणली तर पत्नीची नाराजी चुटकीसरशी निघून जाते. पत्नी नाराज होते तेव्हाच नव्हे तर पत्नीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नवरेमंडळी महागडया साडया खरेदी करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाही याला अपवाद नाहीत. त्यांनीही आपल्या पत्नीवरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली.
कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीच्या साडया प्रदर्शनाच्या उदघाटनच्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नी पार्वतीसाठी ही खरेदी केली. सोन्याचे धागे असलेली नारंगी रंगाची साडी त्यांनी खरेदी केली.
ही साडी वॉटरप्रूफ असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही साडी विकत घेण्याआधी लिटरभर पाणी त्या साडीवर ओतले आणि साडी ओली झाली नाही याची खातरजमा केल्यानंतर त्यांनी ती विकत घेतली.