जलसाक्षरता दिंडी
By Admin | Updated: April 15, 2016 23:28 IST2016-04-15T01:54:42+5:302016-04-15T23:28:40+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे जल दिनानिमित्त गावातून जलसाक्षरता दिंडी काढण्यात आली.

जलसाक्षरता दिंडी
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे जल दिनानिमित्त गावातून जलसाक्षरता दिंडी काढण्यात आली.
सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण करताना दिसून येत आहेत. तेव्हा पाणीबचतीसाठी जिल्हा परिषद मराठी शाळा व जनता विद्यालय शाळा, खामखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून जलसाक्षरता दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, देश वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा. पाण्याचा काटकसरीने वापर करा आशा घोषणा देऊन पाण्याविषयी जनजागृती करण्यात येऊन गाव व परिसर पिंजून काढला. यावेळी जिल्हा परिषद शाळा व जनता विद्यालय शाळेतील मुख्याध्यापक भामरे व महिरे यांनी चौका-चौकातून चौक सभा घेऊन नागरिकांना पाणी बचत विषय मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक एल.एन. कोर, पगार, आबा शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख शिरीष पवार, दोन्ही शाळेंचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.