धंतोली, नारा, नारी सह अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: March 2, 2016 02:21 IST2016-03-02T02:21:45+5:302016-03-02T02:21:45+5:30
नागपूर : वीज पुरवठा खंडित झाल्याने नवेगाव खैरी डॅम शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. या डॅमधून ओंकारनगर, धंतोली, नारा, नारीज व जरीपटका पाण्याच्या टाकीला पुरवठा होते. पाणी पुरवठाच ठप्प असल्यामुळे २ मार्च रोजी सकाळी या टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांना पाणी मिळणार नाही. वीज पुरवठा खंडित झाल्याने पेंच-४ मधून होणारा पाणीपुरवठा सुद्धा ठप्प झाला आहे. ओसीडब्ल्यूतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार नवेगाव डॅमचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

धंतोली, नारा, नारी सह अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा ठप्प
न गपूर : वीज पुरवठा खंडित झाल्याने नवेगाव खैरी डॅम शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. या डॅमधून ओंकारनगर, धंतोली, नारा, नारीज व जरीपटका पाण्याच्या टाकीला पुरवठा होते. पाणी पुरवठाच ठप्प असल्यामुळे २ मार्च रोजी सकाळी या टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांना पाणी मिळणार नाही. वीज पुरवठा खंडित झाल्याने पेंच-४ मधून होणारा पाणीपुरवठा सुद्धा ठप्प झाला आहे. ओसीडब्ल्यूतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार नवेगाव डॅमचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.