पाणीपुरवठा विभागाला हवे अतिरिक्त मनुष्यबळ महापालिका : ४४० कर्मचार्यांची मागणी
By Admin | Updated: July 13, 2015 16:07 IST2015-07-13T16:07:21+5:302015-07-13T16:07:21+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.

पाणीपुरवठा विभागाला हवे अतिरिक्त मनुष्यबळ महापालिका : ४४० कर्मचार्यांची मागणी
न शिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळाला मंगळवार, दि. १४ जुलैपासून प्रारंभ होत आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेचा बांधकाम, पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभाग आपल्या स्तरावर नियोजनात गुंतला असून, विभागांनी त्यांना हव्या असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. शासनानेही १४ जुलैच्या आत प्रतिनियुक्तीवर कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शासनाच्या अन्य विभागांकडे मागणी नोंदविलेली आहे. सिंहस्थात पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेची मोठी जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असणार आहे. महापालिकेमार्फत तपोवनातील साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन जलकंुभांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेमार्फत पेठरोड, दिंडोरीरोड व आडगाव या तीन ठिकाणी बा वाहनतळे उभारण्यात येत असून, त्याठिकाणी ४८ पीव्हीसी पाण्याच्या टाक्या आणि ३९२ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महामार्ग बसस्थानक, सिन्नर फाटा मार्केट यार्ड, सातपूर बसस्थानक, निलगिरी बाग, पंचवटी स्टेडियम, पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार मार्केट या अंतर्गत वाहनतळांवरही सुमारे ५२ पाण्याच्या टाक्या, तसेच २५८ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविक मार्गांवरही पाणीपुरवठ्याची सोय राहणार आहे. या सर्व पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी ४४० अतिरिक्त कर्मचार्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.