जलप्रदाय समितीचे तक्रार निवारण शिबीर

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

फोटो आहे..

Water Supply Committee's Grievance Redressal Camp | जलप्रदाय समितीचे तक्रार निवारण शिबीर

जलप्रदाय समितीचे तक्रार निवारण शिबीर

टो आहे..
१५८ तक्रारी प्राप्त : देशुमख यांच्याहस्ते उद्घाटन
नागपूर : पाणी देयकासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महापालिके च्या जलप्रदाय समितीतर्फे झोननिहाय शिबिराचे आयोजन सुरू आहे. सोमवारी धरमपेठ झोन येथे आमदार सुधाकर देशमुख यांच्याहस्ते तक्रार निवारण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी आदी उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशी १५८ तक्रारी प्राप्त झाल्या. डेमो झोनमधील वाढीव पाणी बील माफ करण्याचा निर्णय स्थायी समिती घेणार असल्याची माहिती सिंगारे यांनी दिली. जोशी यांच्या पुढाकाराने ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा करून त्यांचे समाधान करण्यात आले. छेदीलाल वर्मा व भुपेंद्र बघेल व पार्वती गुप्ता यांच्यासह नागिरकांचे पाणी बील कमी करण्यात आले. पाणी बिलासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी असतील त्यांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर झोन सभापती वर्षा ठाकरे, नगरसेविका अश्विनी जिचकार, सफलता आंबटकर, नगरसेवक संजय बोंडे, संजय बंगाले, सुमित्रा लुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Water Supply Committee's Grievance Redressal Camp