३२ गावांना टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 13, 2016 00:05 IST2016-03-13T00:05:09+5:302016-03-13T00:05:09+5:30
श्री.बोरसे साहेब यांच्याकडे द्यावे

३२ गावांना टँकरने पाणीपुरवठा
श री.बोरसे साहेब यांच्याकडे द्यावेजळगाव : जिल्ात टंचाईच्या झळा तीव्र होत असून टंचाईग्रस्त गावे व टँकरचीसोबतच विहीर अधिग्रहन, विंधन विहिरींची संख्या वाढत आहे. अत्यल्प पावसामुळे जिल्ात डिसेंबर महिन्यापासून टंचाईची स्थिती भासत आहे. जिल्ातील २३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. त्यात जळगाव तालुक्यात एक, जामनेर तालुक्यातील आठ गावात, चाळीसगाव तालुक्यात एक, अमळनेर तालुक्यात पाच गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील आठ गावांचा समावेश होता. शासकीय दहा व खाजगी पाच टँकरच्या मदतीने हा पाणीपुरवठा होत होता. यामध्ये पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा व भडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक या दोन गावांमध्ये टँकरसाठीचा प्रस्ताव आला आहे. त्यानुसार या दोन्ही गावांसह चाळीसगाव तालुक्यातही एका टँकरला मंजुरी देण्यात आली असून सोबतच अमळनेर तालुक्यातील आणखी सहा गावांच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता ३२ गावांमध्ये २४ टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. यात शासकीय १० तर खाजगी १४ टँकरचा समावेश आहे. विहीर अधिग्रहणही वाढले...जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी आतापर्यंत विहीर अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या आता ९९ वरुन १३८ झाली आहे. विंधन विहिरींचीही संख्या वाढली...जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील चिखली, शेवगे, मनूर बुद्रुक, मनूर खुर्द, बोरगाव, लोणवाडी तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद, धानवड, धानवड तांडा, बिलवाडी, वसंतवाडी, सुरेशदादा जैन नगर, शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो. यासह २२ गावांमधून प्रस्ताव होते. २ मार्च पर्यंत जिल्ातील १५८ गावांमधील ३५८ नवीन विंधन विहीर घेण्यात आल्या होत्या. त्यात आणखी भर पडली आहे. आता १८३ गावांमध्ये ४२० विंधन विहीर घेण्यात आल्या आहेत.