प्रदूषण मंडळ तपासणार गोदावरीच्या पाण्याचे नमुने (कुंभ पानासाठी)

By Admin | Updated: July 13, 2015 16:08 IST2015-07-13T16:08:29+5:302015-07-13T16:08:29+5:30

दहा ठिकाणे निश्चित : पाणी व हवेच्या प्रदूषणाचे होणार मोजमापन

Water samples of Godavari to be examined by Pollution Board (for Aquarius leaf) | प्रदूषण मंडळ तपासणार गोदावरीच्या पाण्याचे नमुने (कुंभ पानासाठी)

प्रदूषण मंडळ तपासणार गोदावरीच्या पाण्याचे नमुने (कुंभ पानासाठी)

ा ठिकाणे निश्चित : पाणी व हवेच्या प्रदूषणाचे होणार मोजमापन
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाहीस्नानाच्या तीनही पर्वण्यांच्या अगोदर व पर्वणीनंतर गोदावरीच्या पाण्याचे नमुने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतले जाणार आहे. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करत जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.
कुं भमेळ्यामध्ये मोठ्या संख्येने साधू-महंत व भाविक शहरात दाखल होणार असून, गोदावरीच्या तटावर भाविक ांची स्नानासाठी गर्दी होणार आहे. या कालावधीमध्ये गोदाचे प्रदूषण रोखण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. महामंडळाकडून गोदावरीच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याची माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विनायक शिंदे यांनी दिली. कुंभपर्वणीच्या काळात पाणी आणि हवेचे नमुने घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जाणार आहेत.
कंुभमेळ्याच्या औचित्यावर गोदावरी नदीवरील रामकुंडापासून थेट तपोवनापर्यंत दहा ठिकाणे महामंडळाकडून निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले जाणार असून, सर्वसामान्य दिवसांमधील जलप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या तुलनेत कुंभमेळा काळामध्ये किती प्रमाणात वाढ झाली, याबाबतचे निरीक्षण या पथकांमार्फत केले जाणार आहे. पर्वणीकाळामध्ये वेळोवेळी हवा व पाण्याचे नमुने घेऊन हवेमध्ये वाढलेले कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण तसेच नदीपात्राच्या पाण्यात मिसळलेले घातक द्रव्य याचे परीक्षण महामंडळाकडून केले जाणार आहे. त्यानुसार तपासणी अहवाल संबंधित यंत्रणेकडे सोपविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Water samples of Godavari to be examined by Pollution Board (for Aquarius leaf)