निळवंडे पाईपलाईनचे पाणी संगमनेरात वचनपूर्ती : संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:01+5:302015-07-15T00:15:01+5:30
संगमनेर : निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे आणलेले पिण्याचे पाणी शहरात दाखल झाल्याने संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

निळवंडे पाईपलाईनचे पाणी संगमनेरात वचनपूर्ती : संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत
स गमनेर : निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे आणलेले पिण्याचे पाणी शहरात दाखल झाल्याने संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विशेष पयत्नातून निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना अंतिम टप्प्यात होती. पाणी येणार म्हणून सर्वांचे लक्ष पाईपलाईनच्या कामाकडे लागले होते. पाईपलाईनच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण चांगलेच तापले. धरणाची पाणी पातळी विशिष्ट मर्यादेच्या खाली गेल्यावर ग्रॅव्हीटीने पाणी देणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे पाणी उचलण्यासाठी पंपींग स्टेशन व स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरची उभारणी करण्यात आली. या जागेसाठी वन विभागाची परवानगी घेवून सर्व कामे पूर्ण करण्यात आली. अखेर सोमवारी पाईपलाईनचे पाणी शहरात दाखल झाले. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर पवार, पाणी पुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे, नगरसेवक नितीन अभंग, विवेक कासार, गोरख कुटे, प्रमिला अभंग, पूनम मुंदडा, जुलेखा शेख, वैशाली बर्गे, पं. स. उपसभापती शालिनी ढोले, जि. प.सदस्या निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे आदी उपस्थित होते. (पतिनिधी)----------माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून शहराचा ५० वर्षांचा पाणीपश्न कायमचा सुटणार आहे. जलश्ुध्दीकरण केंद्राचे काम पगतीपथावर असून शहरास यापुढे २४ तास पूर्ण दाबाने स्वच्छ व शुध्द पाणी मिळेल. - दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षाफोटो-१४एसएएनपी०१ पाणी