पाणी ओसरले, पण सर्वत्र विनाशाच्या खुणा

By Admin | Updated: September 22, 2014 03:28 IST2014-09-22T03:28:00+5:302014-09-22T03:28:00+5:30

जम्मू-काश्मीरच्या अनेक पूरप्रभावित भागातील पाणी ओसरले आहे. पण त्याने मागे सोडलेल्या विनाशाच्या खुणा मात्र मन हेलावून सोडणाऱ्या आहेत़

Water drops, but everywhere signs of destruction | पाणी ओसरले, पण सर्वत्र विनाशाच्या खुणा

पाणी ओसरले, पण सर्वत्र विनाशाच्या खुणा

श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या अनेक पूरप्रभावित भागातील पाणी ओसरले आहे. पण त्याने मागे सोडलेल्या विनाशाच्या खुणा मात्र मन हेलावून सोडणाऱ्या आहेत़ श्रीनगरातील लाल चौक आणि आजूबाजू्च्या भागातील पाणी ओसरले आहे़ पण अद्यापही येथील व्यावसायिक क्रियाकलाप सुरू होण्यासाठी दीर्घकाळ जावा लागणार आहे़
काश्मीरच्या व्यावसायिक केंद्र राहिलेल्या लाल चौकातील रस्त्यांवर ब्रॅण्डेड कंपन्यांचे कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, घड्याळे आणि हस्तकलाकृती अशा अनेक वस्तू विखुरलेल्या आहेत़ या वस्तू आता कधीही उपयोगात येऊ शकत नाहीत़
पुरात जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेनजीकचे ५० कि.मी.पेक्षा अधिक लांबीच्या तिहेरी कुंपणाचेही नुकसान झाले आहे़ अनेक ठिकाणचे फ्लड लाईट खराब झाले आहेत़ घुसखोरीच्या घटना रोखण्यासाठी हिवाळ्यापूर्वी कुंपण आणि फ्लड लाईटची दुरुस्ती आवश्यक आहे़ यासाठी लष्कर युद्धस्तरावर कामात जुंपले आहेत़ हिवाळ्यापूर्वी याची दुरुस्ती न झाल्यास घुसखोर याचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत शिरण्याचा धोका आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Water drops, but everywhere signs of destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.