पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देण्याची मागणी
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी देण्याची मागणी
>राजगुरुनगर;- भीमा नदीतील पाणीपातळी खालावल्याने, भीमा नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या १० गावांनी आज खेड उपविभागीय अधिकार्यांकडे या योजनांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.भाजप नेते शरद बुे-पाटील आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या गावांतील लोकांनी आज उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांना याबाबत निवेदन दिले. भीमा नदीवरील शिरोली ते संगमावाड़ी दरम्यानच्या दौंडकरवाडी, संगमवाडी, पिंपळगाव, वाटेकरवाडी, खरपुडी, काळूस ,निमगाव, दावड़ी या गावांच्या पाणीयोजना नदीपात्रात पाणी नसल्याने बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. चार-पाच दिवसात या परिसरातील ३ कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांमध्ये पाणी न आल्यास २५ ते ३० हजार लोकसंख्या व जनावरांचे पाण्याअभावी हाल होणार आहेत. म्हणून तातडीने या परिसरातील नदीपात्रात टंचाई उपाय योजनेंतर्गत पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे. जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यात दिला आहे. फोटो;- भीमा नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या १० गावांच्या ग्रामस्थांनी, शरद बुे-पाटील आणि अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज खेड उपविभागीय अधिकार्यांकडे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले.