सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाणी बिल

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:02+5:302015-02-14T23:51:02+5:30

Water bill with the signing of retired officers | सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाणी बिल

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाणी बिल

>जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?
नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पाठविली जातात. परंतु विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहेमान ३१ जानेवारी २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले असतानाही फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याच स्वाक्षरीने ग्राहकांना पाणी बिल पाठविली जात आहेत.
नगरयंत्री एस.एस.गायकवाड यांच्यकडे जलप्रदाय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे लोकनिर्माण विभाग, ई-गव्हर्नन्स तसेच विविध प्रकल्पांची जबाबदारी आहे. अतिरिक्त प्रभार म्हणजे १० टक्के जबाबदारी सांभाळणे असा लावला जातो. वास्तविक जलप्रदाय विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याची गरज आहे.
गायकवाड यांच्याकडे अनेक विभागाची जबाबदारी असल्याने त्यांना जलप्रदाय विभागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातच त्यांनी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे जलप्रदाय विभागात अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
चार अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
मनपाचे उपअभियंता दिलीप जामगडे, वासुदेव गदरे, विजय गभने व बाराहाते आदी जलप्रदाय विभागाची जबाबदारी सांभाळू शकतात. तूर्त या सर्वांकडे महत्त्वाची जबाबदारी नसल्याने त्यापैकी एकाची या विभागात बदली होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Water bill with the signing of retired officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.