Assam Earthquake Video's: 5 झटक्यांनी आसाम हादरला; भूकंपाच्या तडाख्यानं जमिनीतून वर आलं पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:13 PM2021-04-28T12:13:10+5:302021-04-28T12:14:31+5:30

या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच शक्य त्या सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 

watch videos and photos after the earthquake tremors in Assam | Assam Earthquake Video's: 5 झटक्यांनी आसाम हादरला; भूकंपाच्या तडाख्यानं जमिनीतून वर आलं पाणी!

Assam Earthquake Video's: 5 झटक्यांनी आसाम हादरला; भूकंपाच्या तडाख्यानं जमिनीतून वर आलं पाणी!

Next

गुवाहाटी : आसामला (Assam) बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र झटके (earthquake) बसले. अनेक भागांतून भयावह फोटोज आणि व्हिडिओज समोर येत आहेत. गुवाहाटी आणि तेजपूरमध्ये अनेक इमारतींना भेगा गेल्या आहेत. आसामाला एकानंतर एक, असे एकूण पाच झटके बसले. मात्र, अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे झटके एवढे तीव्र होते की अनेक घरांच्या भिंतीही तुटल्या आहेत. एवढेच नाही, तर तांदळाच्या एका शेतात तर जमिनीतून पाण्याची धारच सुरू झाली आहे. (watch videos and photos after the earthquake tremors in Assam)

या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच शक्य त्या सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. 

एवढा तीव्र भूकंप, की जमिनितून पाणीही बाहेर आलं - 
आसाममध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता एवढी अधिक होती, की येथील नारायणपूरमधील एका तांदळाच्या शेतात जमिनीतून पाणी बाहेर येऊन वाहू लागले. 

Assam earthquake: सकाळी, सकाळी आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का

भिंती कोसळ्या खिडक्याही फुटल्या हॉटेलच्या छतातून रुम्समध्ये शिरलं पाणी -
आसाममध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. गुवाहाटीसह पूर्वेकडील काही भागातही भूकंपाचे झटके जाणवले. 7 वाजून 51 मिनिटांनी आलेल्या भूकंपाची रिश्टर  स्केलवरील तीव्रता 6.4 एवढी होती. तर भूकंपाचे केंद्र आसाममधील सोनितपूर येथील ढेकियाजुली येथे होते. सोशल मिडियावर या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे फटो समोर येत आहेत. सर्वाधिक नुकसान गुवाहाटीत झाल्याचे बोलले जात आहे. एढेच नाही, तर गुवाहाटीतील इन्फिनिटी कॉम्प्लेक्सच्या छतातूनही रुममध्ये पाणी घुसल्याचा प्रकार घडला.

नगाव येथे एकाबाजूला झुकली इमारत - 
भूकंपामुळे आसाममधील नगाव येथे एक इमारत पूर्ण पणे झुकली आहे. यावरूनच या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. ही इमारत शेजारीत असलेल्या दुसऱ्या एका इमारतीवर झुकली आहे.

जमिनीला तडे, 30 सेकंदापर्यंत बसले भुकंपाचे धक्के -
आसाम आणि उत्तर बंगालमध्ये या भूकंपाचे झटके बसले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 30 सेकंड हे झटके जाणवत होते. यादरम्यान सर्वकाही जोर जोरात हालत होते. याशिवाय सोनितपूर येथे रस्त्यांनाही तडे गेले आहेत.

गुवाहाटीत सर्वाधिक नुकसान -
आसाममध्ये आलेल्या भूकंपानंतर आरोग्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'तीव्र झटके जाणवले' याच बरोबर त्यांनी गुवाहाटीतील काही फोटोही शेअर केले आहेत.

Web Title: watch videos and photos after the earthquake tremors in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.