शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

एसी, फ्रीजसोबत आता वॉशिंग मशीनही महाग; १० टक्क्यांपर्यंत किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 8:55 AM

कंपन्यांना खर्च पेलवेना

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू होताच महागाई पुन्हा एकदा ग्राहकांना झटके देऊ लागली आहे. कच्चा माल आणि वाहतुकीसाठी वाढलेल्या खर्चामुळे एसी, फ्रीजसोबतच आता वॉशिंग मशीनच्या किमतीही ५ ते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. 

पॅनासोनिक, एलजी आणि हायर या कंपन्यांनी यापूर्वीच वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. तर, सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेन या कंपन्या मार्चपर्यंत दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सणासुदीमुळे कंपन्यांनी दरवाढ करण्याचे टाळले होते. मात्र, आता खर्चाचा बोझा ग्राहकांवर टाकण्याशिवाय कंपन्यांकडे कोणताही पर्याय नाही. पॅनासोनिकने यापूर्वीच एसीच्या किमतीत ८ टक्क्यांची वाढ केली आहे, असे सीएमाचे अध्यक्ष एरिक ब्रागांजा यांनी म्हटले आहे.

अधिक खर्चामुळे कंपन्या चिंतेतकंपन्या येत्या तीन महिन्यांमध्ये आपल्या उत्पादनांमध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ करतील. कमोडिटीच्या किमती, जागतिक मालवाहतूक शुल्क आणि कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेऊन आम्ही फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसीच्या किमतीत सरासरी तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याचे हायर कंपनीचे अध्यक्ष सतीश एनएस यांनी यांनी म्हटले आहे.

‘महागाई टाळणे आता अवघड’हिताची कंपनीचे अध्यक्ष गुरमीत सिंग म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये यापुढे वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही अनेक उपाय करूनही खर्चावर नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने किमतीमध्ये वाढ करावी लागत आहे.  कच्चा माल, कर, वाहतूक यामुळे उत्पादन तयार करण्यासाठी अधिक खर्च होत आहे. यामुळे कंपनी एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ करेल. ही वाढ हळूहळू केली जाईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.