मोदींविरोधात वॉरंटची मागणी

By Admin | Updated: July 28, 2015 01:45 IST2015-07-28T01:45:25+5:302015-07-28T01:45:25+5:30

सध्या विविध वादामुळे चर्चेत असलेले ललित मोदी आता नव्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये ‘ईडी’ने माजी आयपीएल प्रमुख

Warrant demand against Modi | मोदींविरोधात वॉरंटची मागणी

मोदींविरोधात वॉरंटची मागणी

मुंबई : सध्या विविध वादामुळे चर्चेत असलेले ललित मोदी आता नव्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये ‘ईडी’ने माजी आयपीएल प्रमुख ललित मोदी यांच्याविरोधात कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वॉरट जारी करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय एजेन्सी पीएमएलए संस्थेने लंडन स्थित मोदी यांना पाठवलेल्या समन्सवर कोणतेही उत्तर न आल्याने विशेष न्यायालयामध्ये अपिल केले. याबाबतीत एका आधिकारीने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला पाठवलेल्या समन्सवर मोदी यांनी कोणतेही प्रतिक्रीया न दिल्याने आम्ही त्यांच्याविरुध्द विशेष न्यायालयाला वॉरंट जारी करण्याची विनंती
केली आहे. दरम्यान ईडीने मोदी यांच्या अगोदर भारत स्थित मोदींच्या वकीलामार्फत हे समन्स पाठवले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Warrant demand against Modi