धोनीच्या नावे वॉरंट
By Admin | Updated: June 25, 2014 03:05 IST2014-06-25T03:05:54+5:302014-06-25T03:05:54+5:30
एका खासगी याचिकेवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आंध्रच्या स्थानिक न्यायालयाने हजर राहण्यास मंगळवारी वॉरंट बजावले.

धोनीच्या नावे वॉरंट
>अनंतपूर : हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या एका खासगी याचिकेवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आंध्रच्या स्थानिक न्यायालयाने हजर राहण्यास मंगळवारी वॉरंट बजावले. दक्षिणपंथी हिंदू संघटनेचे पदाधिकारी असलेले गोपालराव आणि श्याम यांच्या याचिकेवर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीशांनी हे आदेश दिले आहेत. ही याचिका गतवर्षी दाखल करण्यात आली. त्यात धोनी एका व्यावसायिक पाक्षिकाच्या कव्हरपेजवर विष्णूच्या रूपात झळकला आहे. त्याने अन्य वस्तूंशिवाय एका हातात जोडेही पकडल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या, असे म्हटले आहे.