लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे २४,६३४ कोटी रु. खर्चाच्या चार प्रकल्पांना मंगळवारी मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३१४ किमी अंतराची वर्धा-भुसावळ तिसरी-चौथी लाइन, व गोंदिया -डोंगरगड, चौथी लाइन यांचा समावेश आहे.
रेल्वे जाळ्याचा विस्तार : महाराष्ट्र, म. प्रदेश, गुजरात, छत्तीसगड राज्यांमधील १८ जिल्ह्यांत रेल्वे जाळे ८९४ किमीने वाढेल.रेल्वे वाहतुकीत वाढ : या मार्गामुळे कोळसा, कंटेनर, फ्लायॲश, अन्नधान्य, सिमेंट, पोलाद इ. वस्तूंच्या वाहतुकीत वाढ. अतिरिक्त मालवाहतूक शक्य.पर्यावरण पूरक : २८ कोटी लिटर इंधनाची बचत, ३९ कोटी किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट, जे ६ कोटी झाडे लावण्यासमान आहे.
३,६३३ गावे संपर्कात येणार या चार प्रकल्पांमुळे सुमारे ८५.८४ लाख लोकसंख्या असलेली ३,६३३ गावे संपर्कात येतील. यात विदिशा, राजनांदगाव हे दोन जिल्हे असून सांची, सातपुडा व्याघ्र प्रकल्प, भीमबेटका येथील शैलाश्रय, नवागाव राष्ट्रीय उद्यान ही प्रमुख पर्यटनस्थळे रेल्वेने जोडली जाणार आहेत.
Web Summary : The government approved ₹24,634 crore for four railway projects, including Wardha-Bhusawal and Gondia-Dongargarh lines. This will expand rail network by 894 km across four states, improving freight transport and reducing carbon emissions, benefiting 3,633 villages.
Web Summary : सरकार ने वर्धा-भुसावळ और गोंदिया-डोंगरगढ़ लाइनों सहित चार रेल परियोजनाओं के लिए ₹24,634 करोड़ मंजूर किए। इससे चार राज्यों में रेल नेटवर्क 894 किमी तक बढ़ेगा, माल परिवहन में सुधार होगा और कार्बन उत्सर्जन में कमी आएगी, जिससे 3,633 गांवों को लाभ होगा।